भारताला मिळाले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा निकालाआधीच भारत फायनलमध्ये, मित्राची भारताला मदत
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा निकाल लावण्याआधीच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. भारताला अंतिम सामन्यात स्थान पक्के करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते, पण त्याआधीच भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या हा चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम ऑस्ट्रेलियाचे स्थान आधीच पक्के झाले आहे. अशात अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ बनण्यासाठी भारत आणि श्रीलंका प्रमुख दावेदार होते. पण त्याआधीच श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना न्यूझीलंड संघाने हा सामना २ गडी राखून जिंकला त्यामुळे भारताचे अंतिम सामन्यात स्थान पक्के झाले आहे. तत्पूर्वी भारताकडे अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी सर्वात पहिला मार्ग म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकणे, हा होता. तर दुसरा मार्ग श्रीलंकन संघाच्या प्रदर्शनावर अवलंबून होता.न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्याने श्रीलंका आता अंतिम सामन्यात पोहोचू शकणार नाही. भारत सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून यादरम्यान खेळला जाणार आहे. आता भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा निकाल लागतो की बरोबरीत संपतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी त्याला न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.