न्यायालयाच्या आवारात हल्लेखोरांचा महिलेवर जीवघेणा हल्ला
वकीलाच्या वेषात येत महिलेवर गोळीबार, महिला जखमी, गोळीबार कॅमे-यात कैद
दिल्ली दि २१ (प्रतिनिधी)- दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात आज सकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे साकेत कोर्ट परिसरात खळबळ उडाली आहे. वकिलाच्या पेहरावात एका व्यक्तीने महिलेवर गोळ्या झाडल्या. हा थरार कॅमे-यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये आज दुपारी एका वकिलाने महिलेवर गोळीबार केला. वकिलांच्या वेशात हा हल्लेखोर आला होता होता. कोर्टाच्या आवारातच या हल्लेखोराची आणि जखमी महिलेची झटापट झाली. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिलेची प्रकृती गंभीर असून एम्स रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहेत. साकेत कोर्टात न्यू फ्रेंड्स कॉलनीशी संबंधित एका प्रकरणावर कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी आली होती अशी माहिती समोर आली आहे. तेव्हाच वकिलाच्या वेशात येऊन आरोपीने लॉयर्स ब्लॉकजवळ तिच्यावर गोळीबार केला. आरोपीने महिलेवर चार गोळ्या झाडल्या ज्या तिच्या पोटात आणि इतर भागात लागल्या. या हल्ल्यानंतर हल्लेखोर न्यायालयातून फरार झाला. धक्कादायक म्हणजे, हा गोळीबार सुरू असता कोर्टाच्या परिसरात चांगलीच गर्दी होती. कोर्टाच्या परिसरातच गोळीबार झाल्यामुळे कोर्टातील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या मुख्य गेटवर मेटल डिटेक्टरही आहे असे असतानाही ही घटना घडली. अशा परिस्थितीतमुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये गोळीबार pic.twitter.com/GQGstIQ1gx
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) April 21, 2023
पोलिसांनी या घटनेसंदर्भात तपास सुरु केला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. मात्र, गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. केजरीवाल यांनी यावरून केंद्रावर टिका केली आहे.