Latest Marathi News
Ganesh J GIF

सेलमधील साडीवरुन दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी

महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, एकमेकींच्या झिंज्या धरत धुलाई

बंगरुळू दि २४(प्रतिनिधी)- साडी हा महिलांच्या आवडीचा विषय त्याचबरोबर जर साड्या देशमध्ये भेटत असतील तर महिला तिथे गर्दी करणारच पण सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार फ्री स्टाईल झाली आहे.

महिलांनी साड्या खरेदीसाठी केलेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या साडी खरेदी करणाऱ्या महिलांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बंगंळुरुमधील एका साडीच्या शोरुमधील असल्याचे सांगितले जात आहे. सेलमधील साड्या घेण्यासाठी महिलांनी खूप गर्दी केली आहे. पण या साडी खरेदीदरम्यान दोन महिलांमध्ये तुफान राडा झाला. कारण त्या सेलमध्ये दोन महिलांना एकच साडी आवडली त्यामुळे त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु झाला पण नंतर हे प्रकरण थेट मारहाणीपर्यंत पोहोचले. दोघेंनी एकमेकींची चांगलीच धुलाई केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

 

महिलांच्या वादाचा हा व्हिडिओ. @rvaidya2000 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात  आला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात महिला आणि साडीचे जवळचे नाते बघत कमेंट केल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!