Latest Marathi News
Ganesh J GIF

महाविकास आघाडीचे नेते म्हणतात ‘सरकार कोसळणार नाही’

महाविकास आघाडीत बेबनाव, आमदार अपात्र झाले तरी सरकार टिकण्याचा दावा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे ‘डेथ वॉरंट’ जारी झाले असून येत्या १५- २० दिवसांत हे सरकार पडेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्याकडुनच खंडण करत हे सरकार टिकेल असा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे हे अपयशी ठरले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु आहेत असा मोठा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, “राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार अशी काही परिस्थिती नाही आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर हे सर्व अवलंबून आहे. १६ आमदार जरी अपात्र झाले तरी त्यांना १४९ आमदारांची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या १६५ आमदार आहेत. त्यामुळे सरकार त्यांचे राहील, मुख्यमंत्री बदलू शकतात. मात्र, सरकारला धोका नसल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. त्याचबरोबर १६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल गेलाच तर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाईल. मात्र, दुसरा मुख्यमंत्री येईल. पण या जर तरच्या गोष्टी आहे. पण सरकारला धोका नाही असे भुजबळ ठामपणे म्हणाले आहेत. भुजबळ यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे समोर आले आहे. अद्याप यावर राऊत यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपला ताकद देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. हे भाजपच्या लक्षात आलं आहे. मिंधे आल्यापासून भाजपही रसातळाला जात आहे, त्यामुळेच दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!