
भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला तीन जणांनी बेदम मारहाण करुन डोक्यात सिमेंटचा ब्लॉक करून गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
याबाबत रुपीनगर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रुपिकेश विजय चव्हाण याला अटक केली आहे. तर संस्कार सतीश यलशेट्टी व त्याच्या एका साथीदारावर बी.एन.सी. कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर येथील पंचगंगा हौसिंग सोसायटी समोरील सार्वजनिक रोडवर आरोपी संस्कार याचे दोन मुलांसोबत भांडण सुरु होते. त्यावेळी फिर्य़ादी त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपींनी तु आमच्या भांडणात का येतो असे बोलून शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करुन मारहाण केली. फिर्यादी खाली पडला असता संस्कार याने त्याठिकाणी पडलेला सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख करीत आहेत.