आक्रमक भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मोठा धक्का
न्यायालयाने 'ती' याचिका फेटाळली, वाघ यांच्या अडचणी वाढणार
छत्रपती संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी) – भाजपाच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण भाजप महिला अध्यक्ष चित्रा वाघ याना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या विरोधात केलेले अपील फेटाळले आहे. हा चित्रा वाघ यांना धक्का आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याविरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयानं चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून लावली. मेहबूब शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील एका तरुणीने केला होता. या प्रकरणात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. मेहबूब शेख यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. नंतर याच मुलीने घुमजाव करत चित्रा वाघ यांनीच आपल्याला तसे आरोप करायला सांगितलं होते असे म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात ५० लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या दाव्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
“संविधानाने बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलले नाही पाहिजे याचेही नियम दिले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणि त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल. स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल वक्तव्य करताना यापुढे विचार करा. असे म्हणत शेख यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत वाघ यांना टोला लगावला आहे.