Latest Marathi News
Ganesh J GIF

कसब्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का..! महायुतीचे हेमंत रसनेंनी गड राखला; रवींद्र धंगेकर यांचा पराभव

आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.गेल्या पाच वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. मतदारांनी चित्रविचित्र आघाड्या, युती पाहिल्या.या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा मतदार कोणाला निवडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे हेमंत रासने विजयी झाले असून मविआचे रवींद्र धंगेकर पराभूत झाले आहेत.

सर्व राज्याचे कसबा विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून होते. गेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. आता हेमंत रासने यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक कलामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे हेमंत रासने विजय संपादन केला आहे. तर मविआचे रवींद्र धंगेकर यांना पराभव पत्करावा लागला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!