Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपा नेत्याने किरकोळ कारणावरून केली पत्नीची हत्या

या काराणामुळे संतापला भाजपा नेता, बंदुकीची गोळी झाडत घेतला जीव, हत्येनंतर पती फरार

भोपाळ दि १(प्रतिनिधी)- दारूचे व्यसन हे वाईट असते, त्यामुळे संसाराची राख रांगोळी होते, असे सांगितले जाते, पणकाहीजण त्यातुन बोध घेताना दिसत नाही. मग त्यातून काही चुकीच्या घटना घडतात. अशीच एक घटना मध्यप्रदेशात घडली आहे. भोपाळमध्ये भाजप नेत्याने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्याच्या पत्नीने त्याला दारू पिण्यास मनाई केली या कारणावरुन भाजप नेत्याने आपल्या पत्नीचा थेट गोळ्या झाडून खून केला आहे.

शीला पांडे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर राजेंद्र पांडे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र पांडे भोपाळच्या रातीबड पोलीस स्टेशन हद्दीतील साईनाथ कॉलनीत राहतात. ते टीटी नगर मंडळ भागातील भाजपाचे माजी उपाध्यक्ष आहेत. तर त्यांची पत्नी शीला यादेखील भारतीय जनता महिला मोर्चाच्या सदस्य आहेत. राजेंद्र पांडे यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे पत्नीसोबत वारंवार वाद होत होते. त्याने कुटुंबीयांच्या उपस्थितीत घरातच दारू पिण्यास सुरुवात केली. यावरून त्याचा पत्नीशी वाद सुरू झाला. त्यावर कुटुंबियांनी दोघांना शांत केले. पण काही वेळाने परत दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यावेळी संतापलेल्या राजेंद्रने आपल्या पत्नीला गोळी घातली. जी शीला यांच्या कमरेला लागली. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. राजेंद्र पांडे मात्र फरार आहे.

शवविच्छेदनानंतर शीला हिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याविरुद्ध पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण या घटनेने खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!