Latest Marathi News
Ganesh J GIF

कुख्यात दहशतवाद्याची पत्नी बनणार मंत्री

भारतावर हल्ला करणारा दहशतवादी जेलमध्ये, पत्नी मात्र बननार मंत्री, नेमका प्रकार काय?

दिल्ली दि २०(प्रतिनिधी)- पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन देत आलेला आहे. पण आता तर पाकिस्तान सरकारने पुढचे पाऊल टाकत दहशतवादी यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन पाकिस्तानच्या सरकारमध्ये मंत्री होणार आहे. मलिक हा फुटीरवादी नेता असून तो टेरर फंडिंग प्रकरणी तुरुंगात आहे. यामुळे भारताकडून नापसंती व्यक्त होण्याची शक्यता जास्त आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्वर उल हक काकर यांना देशाचे काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आले आहे. त्या सरकारमध्ये पंतप्रधानांच्या मानवाधिकार विषयावरील विशेष सहाय्यकपदी हुसैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर यासिन मलिक सध्या तिहार तुरुंगात आहे. या दोघांचा विवाह सन २००९मध्ये इस्लामाबादमध्ये झाला होता. यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन हिचा जन्म पाकिस्तानात झाला. तिचे वडील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ होते आणि त्या पाकिस्तान मुस्लिम लीगच्या महिला शाखेच्या माजी सचिव होत्या. मुशालचा भाऊ हैदर अली मल्की हे युनायटेड स्टेट्समधील परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक आणि प्राध्यापक आहेत. मुशाल पाकिस्तानमधील पीस अँड कल्चर ऑर्गनायझेशनची अध्यक्षही आहे. विशेष म्हणजे मुशाल यासिन मलिकपेक्षा २० वर्षांनी लहान आहे. मुशालला चित्रकलेची आवड आहे. वयाच्या सत्तरव्या वर्षी तिने चित्रकला सुरू केली. ती तिच्या अर्ध-नग्न चित्रांसाठी खूप लोकप्रिय आहे.

दहशतवादी-फंडिंग प्रकरणात यासिन मलिकला २०१९ च्या सुरुवातीला अटक केली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्ली न्यायालयाने त्याला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एप्रिल १९६६ मध्ये श्रीनगरच्या मैसुमा भागात जन्मलेल्या मलिकवर १९८९ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या सईद हिचे अपहरण आणि श्रीनगरमध्ये भारतीय हवाई दलाच्या जवानांवर जेकेएलएफच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातही खटला सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!