Latest Marathi News
Ganesh J GIF

चांद्रयान ३ ची चंद्रावर लँड होण्याची तारीख आणि वेळ ठरली

इस्त्रोने दिली महत्वाची माहिती, या तारखेला आणि यावेळेला यान चंद्रावर उतरणार, एैतिहासिक क्षण जवळ

दिल्ली दि २०(प्रतिनिधी)- इस्रोचे बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान३ लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रीने लँडिंगची तारीख जाहीर केली आहे. चांद्रयान ३ मोहिमेने आजच अंतिम डिबूस्टिंग टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला होता, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून चांद्रयान ३ चे अंतर केवळ २५ किमी इतके कमी झाले आहे. चंद्रावर हे यान यशस्वीरित्या उतरल्यास भारतासाठी तो मोठा क्षण असेल. कारण या आधी हे मिशन अयशस्वी झाले होते.

चंद्रयान २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल असे सांगण्यात येत होते. मात्र त्याची वेळ कधी असेल याची अनिश्चितता होती. मात्र आता इस्त्रोने आता याची सविस्तर माहिती दिली आहे. इस्रोने सांगितले होते की आता लँडर मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केली जाईल. आता फक्त चंद्रावर लँडिंगच्या निश्चित जागेवर सूर्य उगवण्याची वाट पाहत आहे. इस्रोने सांगितले होते की, २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकेल. चांद्रयान २ मोहीम ज्या कारणांमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकली नाही त्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चंद्रावर उतरण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. चंद्रावर उतरण्याची कामगिरी आव्हानात्मक आहे. चांद्रयानाचा वेग प्रचंड आहे. हा वेग अत्यंत कमी करून यानाला कोणतीही इजा होऊ न देता काम तडीस न्यावे लागणार आहे. तसेच चांद्रयान-३ मिशनमध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि १४ दिवस प्रयोग करतील. तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून चंद्राच्या पृष्ठभागावरुन येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करेल. दरम्यान रशियाचे लुना २५ हे चांद्रयान हे चंद्रावर लँडिंग होण्याआधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे भारताच्या आधी चंद्रावर पोचण्याचे रशियाचे स्वप्न भंगले आहे.

इस्रोने १४ जुलै रोजी चांद्रयान-३ प्रक्षेपित केले आणि ते पृथ्वीभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत सोडले. चांद्रयानाने प्रक्षेपण केल्यापासून अनेक मोठे टप्पे पूर्ण केले आहेत. या वाहनाने यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करून मोठा टप्पा पूर्ण केला होता. यानंतर त्याने ५ कक्षांमध्ये प्रवेश केला. यानंतर, १७ ऑगस्ट रोजी, लँडर आणि रोव्हर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले होते. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनने त्यांचे लँडर्स चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!