Latest Marathi News
Ganesh J GIF

पप्पांच्या परीने बाईक चालवताना केली जोडप्याची फजिती

तरुणीच्या बाईक ड्रायव्हिंगचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नेटकरी संतप्त, नक्की काय घडले?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्यातील काही व्हिडीओची जोरदार चर्चा होत असते. सध्या सोशल मिडीयावर एका तरूणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात एका तरूणीने बाईक चालवताना स्वतः बरोबर इतरांचीही फजिती केली आहे. एकंदरीत तरुणीला बाईकची स्टंटबाजी चांगलीच महागात पडली आहे.

मुली बाईक चालवताना इतरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. असे अनेकदा गमतीने सांगितले जाते. आणि तरूणीचा व्हायरल व्हिडीओ पाहून त्याची खात्री पटते. कारण व्हिडिओत पाहू शकता की, रस्त्यावर वाहंनाची वर्दळ असताना तरुणी बाईक चालवताना स्टंट करत आहे. तरूणीनं टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. स्टंटसाठी तरूणी बाईकच्या सीट बसून अगदी  बाईक  वाकडी – तिकडी चालवत आहे. आसपासच्या बाकी गाड्यांना कट ही मारत असल्याचं दिसत आहे. पण तरीही ती तरुणी आपल्याच तालात मस्त होती. परंतू तिच्या निष्काळजी ड्रायव्हिंगमुळ मागून येणाऱ्या एका जोडप्याचा अपघात होता. अपघात झाल्यानंतरही मुलगी बाईक थांबवत नाही, तशीच निघून जाते. व्हायरल व्हिडीओमध्ये, ‘पंछी बनूं उड़ती फिरूं’ ऐक गाणे ऐकू येत आहे. व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai नावाच्या पेजवर शेअर केला आहे. अनेकांनी तरुणीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. तर काहीजण तरुणीच्या रॅश ड्रायव्हिंगवर नाराज देखील आहेत.

बाइक, स्कुटी किंवा कार चालवताना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडीओमध्ये दिसतं. त्यामुळं तरूणीच्या ड्रायव्हिंगबाबतचे गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. मध्यंतरी एक तरुणी बाईक घेऊन दुकानात घुसल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!