Latest Marathi News
Ganesh J GIF

कायद्याचे शिक्षण घेणारी मुलगी काॅलेजमधून रूमवर आली आणि..

मैत्रिणीला रूमवर परतताच दिसला धक्कादायक प्रकार, बघा हाॅस्टेलवर काय झाल?

ओैरंगाबाद दि १९(प्रतिनिधी)- औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठातील एका विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मैत्रीण खोलीबाहेर जाताच या तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपविले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

युक्ती सुशिल बुजाडे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थींनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्ती ही ओैरंगाबादमध्ये विधी पदवीचे शिक्षण
घेत होती. ती यंदा शेवटच्या वर्षाला होती. तिच्या परीक्षा तीन महिन्यावर असल्यामुळे त्याची ती तयारी करीत होती. मंगळवारी ती विद्यापीठात गेली. शिकवणी वर्गाला हजेरी लावल्यानंतर परत ती वसतिगृहात परतली. त्यावेळी तिची रूममेट फोनवर बोलत बाहेर गेली. ती परत आल्यानंतर तिला दरवाजा बंद दिसला तिने आवाज देऊनही युक्तीने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे अन्य मुलींना संशय आला. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांना कळवल्यानंतर तिच्या रूमचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा अभ्यासाच्या टेबलवर उभा राहून लटकलेल्या अवस्थेत युक्ती आढळली. यानंतर तिला बजाज रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. मागच्या आठवड्यात १३ जानेवारीलाच युक्तीने आपला वाढदिवस साजरा केला होता. पण त्यावेळी तिचे वागणे सामान्य होते. पण आठवड्यात तिने टोकाचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. युक्ती मुळ चंद्रपूरची आहे.

उच्चभ्रू कुटुंबातील युक्ती ही अभ्यासात हुशार होती.तिचे वडील नागपूरच्या आयटीआय विभागाचे सहायक संचालक आहेत, तर तिचे काका दमन पोलीस विभागात उच्च पदावर आहेत. तसेच भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तिचे दोन्ही आयफोन पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी अधिक तपास निरिक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक सर्जेराव सानप करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!