
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचे पत्नीसोबत थरकाप उडवणारे कृत्य
खून करत रचला वेगळाच बनाव पण पोलीसांनी बिंग फोडत ठोकल्या बेड्या, धक्कादायक कारण समोर
अंबरनाथ दि २९(प्रतिनिधी)- लग्न होऊन १२ वर्षे उलटून गेली तरीही मूलबाळ होत नसल्याच्या वादातून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. यामुळे संतापलेल्या नवऱ्याने बायकोचा खून केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर मार्गावरील ऑर्डनन्स कंपनीच्या वसाहतीत घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असुन पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
नीतू कुमारी मंडल असे खुन झालेल्या पत्नीचे नाव असून रोनीतराज मंडल असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळच्या बिहारमधील असलेल्या या दोघांचं २०११ साली लग्न झाले होते. लग्नाला 12 वर्षे झाली तरी देखील बायकोला मुलबाळ होत नसल्याने रोनीतराज तणावात होता. मूलबाळ होत नसल्याने नीतू कुमारीची आयव्हीएफ ट्रीटमेंटही सुरू होती. याच कारणावरून तो बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालायचा. रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केल्यानंतर तो जेवत असताना त्याचे पत्नीसोबत पुन्हा वाद झाले आणि त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. यानंतर त्याने शेजाऱ्यांना बोलावले आणि माझ्या बायकोला कोणीतरी ठार मारले असे सांगत खूनाचा बनाव रचला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मात्र, रोनीतराज सांगत असलेल्या गोष्टीवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर आरोपी नवऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पती रोनीतराज यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. आरोपी नवऱ्याला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारची कंपनीत काम करणाऱ्या
व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.