Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात प्रेयसीने चाकूने वार करत केली प्रियकराची हत्या

अभ्यासासाठी एकत्र आले आणि 'त्या' कारणाने भांडत बसले, प्रेयसीही जखमी, पोलीसांकडुन तपास सुरू

पुणे दि २९(प्रतिनिधी)- अभ्यासासाठी खोलीवर गेलेल्या प्रेयसीने प्रियकराचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरातून समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यशवंत मुंडे असे मृत प्रियकराचे नाव आहे. तर आकांक्षा पन्हाळे असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृत यशवंत मुंडे आणि संशयित आरोपी आकांक्षा पन्हाळे हे दोघेही वाघोली परिसरात एका कॉलेजमध्ये ‘डाटा सायन्स’ अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दोघेही एकत्र राहत होते. सध्या कॉलेजची परीक्षा सुरु असल्याने दोघे एकत्र अभ्यास करत होते. रविवारी रात्रीही आकांक्षा यशवंतच्या खोलीवर अभ्यासासाठी गेले होती. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे प्रेयसीने रागाच्या भरात भाजी चिरण्याच्या चाकूने यशवंतवर वार केले. त्यानंतर तिने तिथून पळ काढला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास यशवंत महेश मुंडे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मुंडे याला सकाळी रुग्णालयात हलविण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यामुळे खळबळ उडाली आहे.

लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत यशवंत मुंडेचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविचछेदनासाठी पाठवला. तर जखमी आकांक्षाला उपचाराकरीता वाघोली परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. हा सगळा वाद नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!