Latest Marathi News

राजेश टोपेंनी आपल्या पत्नीसाठी गायले रोमँटिक गाणे

पत्नीचीही गाण्याला हटके दाद, पहा राजकारणी टोपेंमधील सुरेल गायक

जालना दि १३(प्रतिनिधी)- कोरोना काळात संपूर्ण राज्यभरात भितीचे वातावरण असताना तेंव्हाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कार्य विशेष लक्षणीय होते. त्यांनी आपल्या स्टाईलमुळे लोकांना फक्त दिलासाच नाही तर कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. त्यामुळे त्यांचे काैतुकही झाले. पण याच राजेश टोपेंचा आणखी एक गुण समोर आला आहे.

राजेश टोपे उत्तम गायक देखील आहेत.चक्क टोपे यांनी गाणे गायले आहे तेही आपल्या पत्नी मनीषा टोपे यांच्यासाठी. राजेश टोपे यांनी गाणे गाण्यासाठी निमित्त होते त्यांच्या वाढदिवसाचे. राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदार संघ असलेल्या घनसावंगीतील एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अचानक टोपेंना कार्यकर्त्यानी गाणं गाण्याचा आग्रह केला. तेंव्हा टोपे यांनी फारसे आढेवेढे न घेता पत्नी मनीषा यांच्याकडे गाण्यामधून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मेरी मेहूबा हो मेरी मेहूबा हा तुम बिलकूल वैसी हो, जैसा मैने सोचा था’ असे या गाणे म्हणत त्यांनी वातावरण रोमांचित केले. या गाण्याचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे.

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यांसमोर पत्नीसाठी गाण गायल्याने मनीषा टोपे यांनी ही गालातल्या गालात हसत आपल्या पतीच्या गाण्याला दाद दिली. दरम्यान त्यांच्या या गाण्याच्या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!