Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसच्या या आमदाराला न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोषी, काँग्रेसचे होणार नुकसान

नागपूर दि १३(प्रतिनिधी)- सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केदार यांनी २०१७ मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. हा काँग्रेससाठी धक्का आहे.

नागपूर जिल्हयातील तेलगाव येथे २०१७ मध्ये महापारेषणचे टॉवर टाकण्याचे काम सुरु होते. पण हे काम करत असताना शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली ती पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार सुनील केदार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सुनील केदार यांनी घटनास्थळी पोहचत उपस्थित इंजिनिअर आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत काम बंद पाडले होते. याची तक्रार केळवद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांना दोन हजार रुपयाचा दंड देखील सुनावण्यात आला आहे. अर्थात सुनिल केदार या विरोधात वरच्या न्यायालयात जावू शकतात त्यामुळे सत्र न्यायालयाचा निर्णय कायम राहणार की वेगळा निर्णय होणार हे केदार यांनी अर्ज केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान केदार यांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सुनील केदार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. ते नागपुरातील सावनेर मतदारसंघातून आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री होते. तसेच केदार यांच्याकडे वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देखील होती. १९९९ चा अपवाद वगळता ते कायम आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!