
पालघर दि ४(प्रतिनिधी)- पालघरमधून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पालघरच्या सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
तृप्ती कौस्तुभ घरत असं या महिला डॉक्टरचं नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. तृप्ती यांचा मृतदेह राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. त्या बीएएमएस एमडी डाॅक्टर होत्या. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तृप्ती यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तृप्ती यांच्याजवळ एक सुसाईट नोटही सापडली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.