Just another WordPress site

खासदार नवनीत राणा गरब्यातील ‘या’ गाण्यावर डान्स केल्यामुळे ट्रोल

सोशल मिडीयावर अनेकांनी धरले धारेवर पहा कोणत्या गाण्यामुळे वाद(Video)

अमरावती दि ४(प्रतिनिधी)- हनुमान चालीसावरुन तत्कालीन ठाकरे सरकारवर टिका करत रान उठवणा-या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या नवरात्र उत्सवात गरब्यातील डान्सवरून चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्या चक्क अल्लाह के बंदे या गाण्यावर डान्स करत आहेत.

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा गरबा आणि दांडियाचे आयोजन करत असतात.राणा या खासदार असण्याबरोबरच अभिनेत्री देखील आहेत. तर त्या आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दांडिया खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. पण हनुमान चालीसा पुस्तक सतत हातात ठेवत रान उठवणारे राणा दाम्पत्य चक्क अल्लाह के बंदे या गाण्यावर दांडीया गरबा खेळत असल्याचे दिसून आले. ठाकरे सरकारला आव्हान देत मातोश्रीपुढे हनुमान चालीसाचे वाचन करू म्हणाणा-या राणा अल्लाह के बंदे गाण्यावर थिरकल्याने त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. हनुमान चालीसाचे काय झाले असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

GIF Advt

नवनीत राणा कोणत्याना कोणत्या कारणानं नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात.खासदार झाल्यानंतर त्यांनी संसदेत जय श्री रामच्या घोषणा देणाऱ्या खासदारांवर टिका केली होती. पण अचानक पूर्णपणे विरोधी भूमिका घेत हनुमान चालीसा आंदोलन केले त्यामुळे त्यांना जेलवारीही करावी लागली होती.पण आता पुन्हा अल्लाह के बंदे गाण्यामुळे त्या वादात सापडल्या आहेत. शिवसेनेने सी ग्रेड अभिनेत्री म्हणत त्यांच्यावर टिका केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!