Just another WordPress site

पालघरमध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा

सुसाईड नोटने वाढवला सस्पेन्स, परिसरात खळबळ

पालघर दि ४(प्रतिनिधी)- पालघरमधून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पालघरच्या सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

GIF Advt

तृप्ती कौस्तुभ घरत असं या महिला डॉक्टरचं नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. तृप्ती यांचा मृतदेह राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. त्या बीएएमएस एमडी डाॅक्टर होत्या. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तृप्ती यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तृप्ती यांच्याजवळ एक सुसाईट नोटही सापडली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!