
पुण्यामध्ये बोगस NA ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ, बघा नेमकी बातमी काय..?
कधी होणार कारवाई...?
पुणे शहर प्रतिनिधी – पुण्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. पुण्यामध्ये बोगस NA ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचं आढळून आलं आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरामध्ये बोगस NA ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे.
यामुळे अकरा अधिकारी यापूर्वी निलंबित झाले असूनही हे प्रकार थांबत नाही.
यासंदर्भात स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील म्हणाले की मार्च, एप्रिल महिन्यातील NA ऑर्डर घोटाळ्यातील प्रकरणांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. पुण्यात बोगस येणे ऑर्डर जोडून आजही बोगस दस्त नोंदणी सुरूच आहे.1 ते 27 मधील सर्व सब रजिस्टर, अधिकाऱ्यांना हाताशी धरून ऑफिसमध्ये राजरोसपणे बोगस नोंदणी करत आहेत. यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
बोगस येणे ऑर्डरचे 300 पुरावे दिले तेव्हा 5 गुन्हे दाखल केले आहेत. त्वरित कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर म्हणाले की या संदर्भात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील चौकशीनुसार इतरांवर कारवाई केली जाईल