Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नानंतर पतीसोबत पहिल्यांदाच या चित्रपटात झळकणार अभिनेत्री

दोघांची केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक, अभिनेत्रीवरील ती कमेंट चर्चेत

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील मोस्ट अवेटेड कपल अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच लग्नबंधणात अडकले आहेत. आता लग्नानंतर पहिल्यांदाच कियारा आणि सिद्धार्थ हे एका मोठ्या चित्रपटामध्येसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे चाहते त्यांची केमेस्ट्री पाहण्यासाठी इच्छुक आहेत.


सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी ही जोडी करण जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये पाहता येणार आहे. करणने त्यांना आगामी तीन चित्रपटासाठी साईन केले आहे. लग्नानंतर दोघांचा हा पहिलाच चित्रपट रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट असेल. हा चित्रपट करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शन हाऊस बनवला जाणार आहे. वुमन आयपीएलमध्ये कियाराचा जलवा पहायला मिळाला होता.अशातच कियाराने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर पती सिद्धार्थने कमेंट केली आहे. यावेळी कियाराने त्या फोटोला “मला असं वाटतंय मी आज गुलाबी आहे” असे कॅप्शन दिले होते. तिच्या या फोटोवर सिद्धार्थने कमेंट केली आहे. त्यात त्याने “मला रंग लाव” अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर नवरा असावा तर असा असे मत नेटक-यांनी केले आहे.

कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केल्यापासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. दरम्यान लग्नानंतर कियारा लवकरच ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे. तिच्याबरोबरीने या चित्रपटात कार्तिक आर्यन दिसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!