उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी ‘यामुळे’ नेटकऱ्यांच्या निशान्यावर
आपल्या गाण्यामुळे चर्चेत असणाऱ्या मिसेस उपमुख्यमंत्री यामुळे वादात, बघा काय कारण
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कायक्रमातील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्या फोटोवरुन त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.
अमृता फडणवीस यांनी आजवर अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही जण त्यांच्या गाण्याची आतुरतेने वाट बघत असतात. पण आता त्या गाण्यामुळे नाहीतर आपल्या ड्रेसमुळे चर्चेत आल्या आहेत. आता त्यांच्या नव्या फोटोवरुन नेटक-यांनी अमृतांना ट्रोल केले आहे. अमृता यांनी एका कार्यक्रमात डिझायनर ड्रेस परिधान केला होता. त्या ड्रेसवरुन नेटकरी सक्रिय झाले होते. काही नेटक-यांनी अमृतांना ‘अमृता फडणवीस आता उर्फी जावेदचं मार्केट जाम करणार’, अशी कमेंट केली आहे तर काहींनी फडणवीस साहेबांना शोभत नाही तुम्ही मॅडम’ असं म्हटले आहे. तर दुसरीकडे काही चाहत्यांनी मात्र अमृता फडणवीस सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे. अमृता फडणवीस याआधीही आपल्या पेहरावावरुन ट्रोलर्सच्या निशान्यावर आल्या होत्या. पण त्यांनी त्या ट्रोलचे कायम स्वागत केले आहे. मला ट्रोल करणारे ट्रोलर्स प्रचंड क्रिएटिव्ह आहेत आणि त्यांच्याकडे बराच वेळ असतो. मात्र, ते सारेच महाविकास आघाडीने पाच पैसे देऊन ट्विटरवर धाडलेले सैन्य आहेत. मी माझ्या सासूबाईंना सोडून कुणालाच घाबरत नाही असे ओपन चॅलेंज त्यांनी आपल्या ट्रोलर्संना दिले आहे.
अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. मी गायिका आहे आणि लहानपणापासून आजी, वडील व इतर गुरूंकडून गाणे शिकते आहे. त्यामुळे मी गाते, असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.