Latest Marathi News

आमदार रोहित पवार यांना बारामती ॲग्रो बंद करण्याची नोटीस

रात्री दोन वाजता पाठवली नोटीस, या दोन नेत्यांच्या सांगण्यावरून झाली कारवाई, राज्यात राजकीय चर्चेला उधान

पुणे दि २८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटावर जोरदार टिका करणारे रोहित पवार यांना जोरदार झटका बसला आहे. रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. रात्री दोन वाजता रोहित पवारांच्या हातात नोटीस देऊन बारामती अॅग्रोचे बारामतीतील दोन प्लांट बंद करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बारामती येथील बारामती अॅग्रो प्लांट हा मोठा प्लांट आहे. रोहित पवार हे या कारखान्याचे मालक आहे. शेती संबंधित अनेक माल या ठिकाणी तयार होत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासूंन हा कारखाना वादात सापडला आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने मध्यरात्री २ वाजता रोहित पवार यांना नोटिस पाठवून हा कारखाना बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.” असा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी सरकारवर उपरोधिक टिका केली आहे. सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही. असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

रोहीत पवार यांच्या एक्स पोस्टनंतर ‘ते’ दोन नेते नेमके कोण? ज्यामुळे त्यांच्या कंपनीला ही नोटीस पाठविण्यात आली याबातब राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. रोहित पवार यांचा अंगुलीनिर्देश नेमका कोणाकडे आहे, याबाबत विचारणा होऊ लागली आहे. आता रोहित पवार यांनी न्यायालयीन लढाईचे संकेत दिले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!