Latest Marathi News
Ganesh J GIF

भागीदार तरुणाची महिलेला केसाने ओढत बेदम मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, नेटिझन्समध्ये संतापाची लाट, तरुणीचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न

अहमदाबाद दि २८(प्रतिनिधी)- अहमदाबादमध्ये एका स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला स्पा सेंटरच्या मालकाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामागचे धक्कादायक कारण देखील समोर आले आहे.

अहमदाबादमधील हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ २५ सप्टेंबर रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत दिसत आहे की, मोहसीन पीडित महिलेला वारंवार मारहाण करत आहे. तिने प्रतिकार करण्याचा आणि स्वत:चे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचे केस ओढले. या झटापटीत त्यानं तिचे कपडेदेखील फाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एक व्यक्ती मोहसीनला समजावण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र तो तरुणीला मारणे सुरूच ठेवतो. या घटनेनंतर दोन दिवस पीडित महिलेने मोहसीनविरोधात तक्रार दाखल केली नव्हती. यामागचे कारण म्हणजे महिला त्या स्पाची भागीदार व मोहसिनची बिझनेस पार्टनर आहे. हा व्हिडिओ अहमदाबाद शहरातील पॉश इलाका सिंधुभवन येथील आहे. बोडकदेव पोलिसांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने तिच्याशी संपर्क साधला आणि तिचे समुपदेशन केले. त्यानंतर तरूणीने मोहसिन विरोधात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी महिलेने सांगितले की, या घटनेनंतर मोहसिनने तिला सॉरी म्हटले होते. त्यामुळे तिने तक्रार दाखल केली नव्हती. मात्र व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पण आरोपी सध्या फरार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!