टायगरसोबत ब्रेकअपनंतर ही अभिनेत्री पडली पुन्हा प्रेमात
त्या सेलिब्रेटीसोबतचे अभिनेत्रीचे फोटो व्हायरल, टायगरच्या बहिणीशी आहे नाते
मुंबई दि २(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये कधी कोणाचे ब्रेकअप होईल आणि कधी कोणाचे सुर जुळतील हे सांगता येत नाही. आता अभिनेत्री दिशा पटानी टायगर श्रॉफ सोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा चर्चेत आली आहे.
हल्ली दिशा पटानी एका व्यक्तीसोबत दिसतेय. त्या व्यक्तीचं नाव आहे अॅलेक्झेंडर अॅलेक्स. त्यामुळे दिशा पटानी टायगर श्रॉफनंतर अॅलेक्झेंडर अॅलेक्सच्या प्रेमात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. अॅलेक्ससोबतचे दिशा पटानीचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.अभिनेता कार्तिक आर्यनच्या बर्थडे पार्टीमध्ये दिशा एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली होती. दिशा आणि ॲलेक्झांडरची भेट जिममध्ये झाल्याचं कळतं. विशेष म्हणजे ॲलेक्झांडर हा जिम ट्रेनरसुद्धा असून दोघं एकत्र वर्कआऊट करतात.ॲलेक्झांडरने आपल्या इन्स्टाग्रामवर दिशासोबतचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ॲलेक्झांडरची टायगर श्रॉफ आणिबाणी त्याची बहीण कृष्णा यांच्यासोबतही चांगली मैत्री आहे. इतकंच नाही तर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा हीच्यासोबत खास मैत्री आहे. टायगर श्राॅप बरोबरचे नाते संपल्यानंतर दिशा ॲलेक्झांडर आपला वेळ स्पेंड करताना दिसत आहे.
सर्बियाचा राहणारा ॲलेक्झांडर हा अभिनेता असून सध्या तो मुंबईत राहत आहे. मात्र या दोघांनी कधी माध्यमांसमोर त्याची कबुली दिली नाही. मात्र दिशा पटानी ही ॲलेक्झांडरसोबत बऱ्याचदा दिसून आली आहे. दरम्यान इन्स्टाग्रामवर दिशाचे जवळपास ५५.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्राम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.