Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नानंतर या अभिनेत्रीची ती पोस्ट होतेय व्हायरल

म्हणाली मला तुमच्या पाठिंब्याची गरज, चर्चेला उधान

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मराठी मालिका विश्वासतील प्रसिद्ध जोडी जी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचली असे हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचं लग्न थाटामाटात पार पडलं. दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात आता अक्षयाची एक पोस्ट व्हायरल होत आहे.


मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. सगळी काही उत्साहात पार पडल्यानंतर अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहले आहे राणा अंजलीला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळाले. आमच्यावर प्रेम केलेत, जे सकारात्मक वातावरण तयार निर्माण झाले याने आम्ही भारावून गेलो आहोत. आमचं नाव आयुष्य सुरु होत आहे आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तसेच आम्ही लवकरच लग्नाचे आणखीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करू, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला होता. दोघांनी घेतलेल्या उखाण्यांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. या मालिकेला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती. तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. यावेळीच त्यांचे प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.आता लग्नानंतर ते एकत्र कधी काम करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!