Latest Marathi News

…म्हणून जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत केले लग्न

अकलुजच्या लग्नाची सगळीकडेच चर्चा, अजब लग्नाची गजब कहाणी

अकलुज दि ३(प्रतिनिधी)- मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एकाच तरुणासोबत विवाह केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली आहे. नवरदेव माळशिरस तालुक्यातील असून याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे . या अनोख्या विवाहाचे कारणही लग्नासारखेच खास आहे.

कांदिवली येथील आयटी इंजिनियरिंग आणि गलेलठ्ठ पगार मिळवणाऱ्या पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. त्यांना बालपणापासून मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला या निर्णयाला कुटुंबाने विरोध केला, पण अखेर त्याच्या कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली होती. आणि हा विवाह सोहळा पार पडला दोन जुळ्या बहिणीशी विरोध करणारा तरुण मुंबईत ट्रॅव्हलचा व्यवसाय करतो. रिंकी आणि पिंकी वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर या मुली आईसोबत राहत होत्या . एकदा त्या आजारी पडल्यावर अतुल याच्या गाडीतून त्या दवाखान्यात जात असत . याचवेळी अतुल आणि या दोन तरुणींचा संपर्क वाढत गेला. आणि त्यांच्यात प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर याची सर्वत्र चर्चा सुरु झाली.

पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी असून त्यांच्या सवयीसुद्धा एकसारख्या आहेत. इतकंच काय तर एकीला त्रास झाल्याच तो दुसरीलासुद्धा जाणवतो. याशिवाय त्यांची आवडी निवडीही एकच आहे. आता त्यांनी एकाच तरुणासोबत आपल्या वैवाहिक जीवनाची सुरूवात केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!