‘कर्णधारपदाचे गाजर दाखवून दोन महिन्यात बाहेर केले’
विरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा, धोनी व कोहलीबाबत केले धक्कादायक विधान
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजीने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पण त्याचबरोबर तो आपल्या सडेतोड वक्तव्यामुळेही चर्चेत असतो. सेहवाग सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. पण नुकताच विरेंद्र सेहवाहने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
भारताचा सलामीवर सेहवाग संघाचा उपकर्णधार होता. पण त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. यावर त्याने मोठा खुलासा केला आहे. सेहवागला भारतीय संघाचा कर्णधार होण्याची सुवर्ण संधी २००५ मध्ये ग्रेग चॅपेल प्रशिक्षक आणली होती, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सौरव गांगुलीला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले गेले आणि अखेरीस संघातून बाहेर पडल्यानंतर ही जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपवण्यात आली. पण त्यानंतर अनपेक्षितपणे धोनीला कर्णधार करण्यात आले. तो म्हणाला “जेव्हा ग्रेग चॅपल आले, तेव्हा चॅपलने पहिले विधान दिले होते की सेहवाग पुढचा कर्णधार असेल. कर्णधारपदाचे गाजर दाखवून थेट मला दोन महिन्यांत संघातून वगळण्यात आले. नक्की काय झाले हे त्यांनाच माहिती! असा खुलासा सेहवागने केला. यावेळी प्रशिक्षकावरुनही त्याने आपले मत व्यक्त केले आहे.मला वाटते की भारतीय संघाला कोचिंगची गरज नाही; त्याला एक मॅनेजर हवा आहे जो स्ट्राइक करू शकेल आणि सर्व खेळाडूंशी मैत्री करू मार्गदर्शन करेल. असे मत व्यक्त करताना गॅरी कर्स्टन हे या बाबतीत निष्णात होते, असे सेहवाग म्हणाला आहे.
विराट कोहली आणि बीसीसीआयचे तत्कालीन सचिव अमिताभ चौधरी यांनी मला कोचपदासाठी अर्ज करायला लावला होता. एक बैठक झाली त्यामध्ये चौधरी यांनी सांगितलं की, कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये काही ठिक नसल्याचं सांगत अर्ज भरायला लावला होता. मी त्यावेळी त्यांना हो किंवा नाही असं काही सांगितलं नव्हतं, असा खुलासाही विरेंद्र सेहवागने केला आहे.