Latest Marathi News
Ganesh J GIF

भुकंपात ऑपरेशन रुम हालत असतानाही डाॅक्टरांनी बजावले कर्तव्य

डाॅक्टरांच्या धैर्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, सर्व स्तरातून होतय डाॅक्टरांचे काैतुक

श्रीनगर दि २२(प्रतिनिधी)- मंगळवारी रात्री उत्तर भारतासह दक्षिण आशियातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पण या भूकंपात एक धीर देणारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. यावेळी दुस-याला मदत करताना डाॅक्टर दिसून आले.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे काही वेळासाठी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. तेथे भूकंप झाला त्यावेळी बिजबेहारा येथील उपजिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर प्रसुतीचे ऑपरेशन करत होते. मात्र, त्याचवेळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले,आणि सर्व वस्तू हलायला लागल्या. असं असतानाही डॉक्टर आणि पॅरामेडिक्स टीमने हिंमत न हारता धैर्याने त्यांचे काम सुरूच ठेवले. एवढेच नव्हे तर ऑपरेशन सुरू असतानाच काही वेळासाठी तेथे लाईटही गेले आणि ऑपरेशन थिएटरमध्ये काळोख पसरला. मात्र डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे धैर्य न गमावता शस्त्रक्रिया सुरूच ठेवली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओत भूकंपाचे धक्के बसत असतानाही काही आरोग्य कर्मचारी मास्क आणि ग्लोव्ह्ज घालत सर्जरी करत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये भूकंपामुळे ओव्हरहेड लाईट्स, मॉनिटर आणि आयव्ही ड्रीप स्टँड हलताना दिसत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने हा व्हिडीओ शेअर करताना इतक्या संकटातही रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.

उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण पसरले. सुमारे ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी असल्याचे नमूद केले. या घटनेनंतर मेट्रोची वाहतूक तात्पुरती स्वरुपात बंद करण्यात आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!