Latest Marathi News
Ganesh J GIF

‘एकनाथ शिंदे यांच्या विसर्जनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावे’

महायुतीत गळचेपी होत असल्याने अजितदादांची अमित शहांकडे मोठी मागणी,डिसेंबरमध्ये महायुतीमध्ये मोठा स्फोट?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- अजित पवार आजारापणामुळे सक्रिय राजकारणापासून काहीसे दुर झाले आहेत. पण अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतल्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण आता अजितदादा आणि अमित शहा यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे केले जात आहेत.

अजित पवार यांच्याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी धक्कादायक दावे केले आहेत. तसेच महायुतीत राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत. विनायक राऊत म्हणाले की, अजित पवार यांना आता पश्चाताप झाला आहे. यातून मुक्त कसे व्हावे याचा ते विचार करत आहेत. अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला खरा वाव देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले होते. परंतू, आता तशी परिस्थिती राहिलेी नाही. प्रत्येक गोष्टीत अजित पवारांची गळचेपी केली जात आहे. गेल्या आठवड्यातील अमित शहांच्या भेटीत शिंदे यांच्या विसर्जनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. तसेच तीन तिघाडा काम बिघाडा अशी आपल्याकडे म्हण आहे. फक्त ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाले आहेत. ते त्यांच्यात मिसळलेले नाहीत. भाजपाची हाव खूप मोठी असल्याने आपलंच घोडे रेटण्याचे काम होणार आहे. यामुळे ३१ डिसेंबरपूर्वीच महायुतीत मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान अजित पवार मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यापासून शांत आहेत. पण त्यांच्या अलिप्तेवर शिंदे गटाकडून जोरदार टिका करण्यात आली. तसेच अजित पवार यांच्यावर शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता अजित पवार गटाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे अजित पवार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचा दावा केला जात आहे.

अजित पवारांनी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील सोबत होते. मागील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!