Latest Marathi News
Ganesh J GIF

‘या कारणामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीला दिग्दर्शन निर्माते घाबरतात’

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, दिग्दर्शक काम देण्यास घाबरत असल्याचा दावा, म्हणाली तो काळ खुपच....

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- बाॅलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग रजपूतच्या निधनानंतर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली यावर देखील वाद रंगला होता. यावेळी सुशांतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर अत्यंत गभीर आरोप करण्यात आले होते. तिला यासाठी जेलमध्ये देखील जावे लागले होते. पण आता रियाने एक धक्कादायक दावा केला आहे.

रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. चक्रवर्ती म्हणाली की, २०२० हे वर्षे माझ्यासाठी पार कठीण राहिले. मला चित्रपटांमध्ये कोणीही काम देत नव्हते. दिग्दर्शक मला काम देण्यास घाबरत होते. लोक मला चित्रपट आॅफर करण्यासही घाबरत होते. पण आता काही गोष्टी सुरळीत होत आहेत. नेटकरी आता मला टार्गेट करत नाहीत. हळूहळू सर्वकाही व्यवस्थित होताना दिसत आहे. असे रिया म्हणाली आहे. यावेळी रियाने जेलमध्ये राहण्याचा अनुभव देखील सांगितला आहे. दरम्यान रिया चक्रवर्ती हिच्यावर थेट सुशांत सिंह राजपूत याला बळजबरी ड्रग्स देण्याचे आरोप करण्यात आले होते. याच ड्रग्सच्या प्रकरणात तिला आणि तिच्या भावाला जेलमध्ये राहण्याची वेळ आली होती. दरम्यान रिया चक्रवर्तीने असा दावा केल्यामुळे लवकरच ती नवीन चित्रपटात किंवा वेबसिरिजमध्ये दिसण्याची शक्यता आहे. रिया यावर्षी रोडीजमध्ये सहभागी झाली होती. यात रिया, गौतम आणि प्रिन्स या तीन गँगमध्ये लढाई होती. पण प्रिन्स आणि गौतमच्या वादात रिया चांगलीच बाजी मारून गेली. तिच्या गँगमधील वाशु जैन याने यंदाचं पर्व जिंकले होते.

रिया चक्रवर्ती अरबपती व्यावसायिक निखिल कामथला डेट करत असल्याची चर्चा आहे. निखिल कामथ बिजनेस जगातील मोठं नाव आहे. पण याबाबत अधिकृतपणे कोणीही भाष्य केलेले नाही. नेहमीच रिया चक्रवर्ती हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावरही रिया चक्रवर्ती सक्रिय दिसत असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!