Latest Marathi News
Ganesh J GIF

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

धमकीचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत, बघा कोणी दिली धमकी

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे सतत चर्चेत असतात. कोरोना काळात ते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले होते. असे असताना आता वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे.यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे यामागे कोण आहे याचा तपास पोलीस तपास करत आहेत.

मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला गोळी घालून ठार मारण्याची धमकी देत ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश यांना त्यांच्या व्हाट्सअप नंबरवर ७ फेब्रुवारी रोजी आरोपींनी फोन केला. आरोपींनी ‘आल्फीया शेख या मुलीसोबत तुझा विवाह झाला असून ग्रामसेवक, ग्रामपंचायत, वडगाव, सोयगाव, जिल्हा औरंगाबाद येथील महाराष्ट्र शासनाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवले. हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है. खराडी युवान आयटी पार्क के सामने इनोवा मे बीस लाख रुपये रख देना. आपने नही दिया तो अल्फिया आप पर केस कर देगी’, असा धमकी त्यावेळी देण्यात आली होती. त्यानंतर ५ मार्चलस पुन्हा एकदा मेसेज करुन तीस लाख न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मेरेज सर्टिफिकेट औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव गावाच्या ग्रामसेवकाच्या सहीने काढण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

वसंत मोरे हे मनसेचे धडाकेबाज नेते आहेत. कोरोना काळात त्यांनी आयुक्तांची गाडी फोडली होती. तसेच ते सतत चर्चेत असतात. मनसेच्या भोंग्याविरोधातील आंदोलनामुळेही ते चर्चेत आले होते. तसेच त्यांच्या कामांमुळे देखील ते चर्चेत असतात. आता या धमकीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!