
… ‘या नंतर काँग्रेसचे इतके आमदार भाजपा फोडणार’
शिवसेनेच्या या नेत्याचा मोठा दावा, महाविकास आघाडीत बिघाडी?
ओैरंगाबाद दि ५ (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील १६ आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यास भाजपचा प्लॅन बी तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून न्यायालयीन लढा सुरु आहे. यावर बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाके की, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.त्यामुळे पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार का, या चर्चेला उधाण आले आहे. हा दावा करताना खैरेंनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसलाही लक्ष्य केल असून त्यावर कॉंग्रेसकडूनही खोचक प्रतिक्रिया आली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी चंद्रकांत खैरेच्या या दाव्याला प्रत्युत्तर देत. “जे आपला पक्ष सत्तेत असून सांभाळू शकले नाहीत, तर दुसऱ्या पक्षाविषयी त्यांनी बोलायचं कारण नाही”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. यावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खैरेंच्या विधानानंतर महाविकास आघाडीत तणाव झाल्यानंतर खैरे यांनी आपले विधान माघार घेत २२ आमदारासंदर्भात केलेले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या विधानामुळे पटोले नाराज झाले. भाजप हे फोडाफोडीचे राजकारण करत असते. यामुळे कॉंग्रेस पक्षाला सजग करण्यासाठी आपण हे विधान केले होते. असे म्हणत झैरे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.