Just another WordPress site

इंदूरमध्ये या तरुणीसोबत कारमध्ये जे घडले ते भयंकरच

त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल, तरुणीसोबत नेमके काय घडले

इंदूर दि ५(प्रतिनिधी)- मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणीला चालत्या कारमध्ये ओढत बंदी बनवण्याचा प्रयत्न झाला आहे.तरुणीला कारमध्ये ओढत तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ इंदूरमधील एका उच्चभ्रू भागातील आहे. एक तरुणी जीवाच्या आकांताने एका तरूणाकडे हात सोडण्याची विनंती करत आहे. त्यासोबत ती तरुणी कारमधून उतरण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक तरुण तिचा हात पकडून तिला कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होता. याच वेळी तेथून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. पण या घटनेसंदर्भात अद्याप पोलीस ठाण्यात कसल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. मात्र व्हिडिओच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत. व्हिडीओ ज्या परिसरातील असल्याचे बोलले जात आहे, त्या परिसरातील सीसीटीव्हीचीही तपासणी होऊ शकते.

GIF Advt

पोलीसांनी त्या तरुणीला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेत तिचा जवाब नोंदवला आहे. मात्र त्या तरूणीने या घटनेचे वृत्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांसोबत गैरवर्तन केले आहे. तिने चक्क एका पत्रकाराला मारहाण करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!