Just another WordPress site

अजित दादा राॅक, बंडखोर शाॅक

 'या' बंडखोर आमदारांना अजित पवारांनी केले क्लिनबोल्ड

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन दोन दिवस झाले असून सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, ओला दुष्काळ, महागाई, आरोग्य, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा विषयांवरुन महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलं. पण दुस-या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांची शाळा घेतलेली पहायला मिळाली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची कमी अजित पवार यांनी भरून काढल्याची चर्चा सभागृहात रंगली होती.

अजितदादांनी बंडखोर आमदारांना नियम शिकवित जागच्या जागी गप्पगार केलं.यावेळी मंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांची चांगलीच शाळा पवारांनी घेतली आहे. पाहुयात अजित पवारांनी या मंत्र्यांचा कसा समाचार घेतला.

तानाजी सावंत क्लिनबोल्ड
अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने आरोग मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच धांदल उडाली. अजित पवारांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा याची माहिती द्या, असा प्रश्न विचारला. मात्र उत्तर माहिती नसल्याने तानाजी सावंत शांत बसले. अजित पवारांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांच्याकडे माहिती नव्हती आणि तेव्हा त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.पण विधानसभा अध्यक्षांनी मध्यस्थी करत सोमवारी उत्तर द्या म्हणत सावरण्याचा प्रयत्न केला तर सावंत यांच्या फेमस शब्दावरून देखील पवार यांनी त्यांची कानउघडणी केली. पण सावंताची उडालेली तारांबळ याची चांगलीच चर्चेत रंगली होती.

 

शंभूराज देसाईंना नियमांचा डोस
विधानसभेत शेतकरी प्रश्नावर अजित पवार हे विधिमंडळात बोलत असताना ‘दादा यावेळी राज्यात पाऊस चांगला झाला आहे’ असे शंभूराजे देसाई म्हणाले. त्यामुळे अजित पवारांचा पारा चढला. त्यांनी देसाईना ‘शंभुराज मध्ये बोलायचं नाही आपण एकत्र काम केलंय, मध्ये बोलायचं नाही हे माहिती नाही का… असं म्हणत दादांनी मंत्री देसाई यांची नियमांची शाळा घेतली.

GIF Advt

 

अब्दुल सत्तारांना कोपरखळी
मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या दिवशीच अब्दुल सत्तार यांचं टीईटी घोटाळा प्रकरण समोर आले होते पण त्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत ते प्रकरण तर दाबलेच शिवाय महत्वाचे खातेही मिळवले.त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारीही आश्चर्यचकीत झाले होते.त्यावर आज अजित दादांनी सत्तार यांची फिरकी घेतली. अब्दुल सत्तार तुम्ही कृषी मंत्री झालात, मी तर आश्चर्यचकीतच झालो बाबा…, असा टोला त्यांनी सत्तारांना लगावतानाच दादा भुसेंवर का अन्याय झाला समजलं नाही, असं सांगत शिंदे गटाच्या नाराजीनाट्यावर बोट ठेवल त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आमदारांना सोबत घेत बंडखोरी करत गुवाहाटी गाठली होती. यावेळी अजित पवार निधी देत नाहीत राष्ट्रवादीच्या आमदारांना ताकत देतात असा आरोप केला होता. एक प्रकारे त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केल होत.त्यावर पवार यांनीही समन्वय समितीत शिंदेही होते ते का बोलले नाहीत असा सवाल विचारला होता. त्यामुळे पवार विरुद्ध बंडखोर असा सामना आज पहायला मिळाला.

बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे दाै-यावर आहेत.तर उद्धव ठाकरे अधिवेशनाला आलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाची बिनचूक माहिती असलेल्या अजित पवार यांनीच बंडखोरांना खिंडीत गाठत चांगलीच शाळा घेतली आहे.त्यामुळे सभागृहात अजितदादांच्या दादागिरीची चांगलीच चर्चा रंगली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!