राष्ट्रवादीचे अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार उतावीळ!
अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेवर नेमके बोट! ट्विट करत अजित पवारांना 'यांचा' टोला
मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या एका निर्णयाने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.
शरद पवारांच्या निर्णयानंतर सर्व कार्यकर्ते आणि नेतेमंडळी याचा विरोध करत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी मात्र शरद पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना देखील खडसावले आहे, तसेच सुप्रिया सुळे यांनाही प्रतिक्रिया देण्यापासुन रोखले. दरम्यान, अजित पवारांची ही भूमिका काही कार्यकर्त्यांना, विशेषतः शरद पवार समर्थकांना आवडली नाही. अजित पवारांची वेगळ्या भुमिकेचा धागा पकडत अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबद्दल एक ट्वीट करत अजित पवारांना टोला लगावला आहे. “अजित पवार खूप उतावीळ दिसत आहेत. शरद पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची ते खात्री करून घेत आहेत.” असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष होण्यास अजित पवार उत्सुक असल्याचा टोला अंजली दमानिया यांनी लगावला आहे. दरम्यान शरद पवारांच्या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना अश्रू अनावर झाले. सगळ्यांनी घोषणाबाजी केली. तसेच अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निर्णय शरद पवार मागे घेत नाहीत तोपर्यंत इथून जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. तर काही कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. सध्या देखील शरद पवार यांची मनधरणी करण्यात येत आहे.
Ajit Pawar looking really desperate.
Wants to ensure that Sharad Pawar's resignation is accepted
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 2, 2023
शरद पवारांच्या निर्णयाला सर्वजणांचा विरोध असला तरी अजित पवारांनी मात्र त्याचे समर्थन केले आहे.सगळ्यांच्या भावना पवार साहेबांनी ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. तुम्ही गैरसमज करून घेताय. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाही असं होत नाही. त्यामुळे शरद पवारांच्या आत्ताच्या वयाचा विचार करता सगळ्यांशी चर्चा करून एका नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी ते देऊ पाहतायत. नवीन अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम करेल. अशी भुमिका अजित पवार यांनी मांडली आहे.