Latest Marathi News

अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दिल्लीत निरोपाच्या गाठीभेटी, महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडत आहेत. अजित पवार सत्तेत आल्यापासून शिंदे गटात निर्माण झालेली अस्वस्थता अजूनही कायम आहे. दोन दिवसापूंर्वी अजित पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांबरोबर अर्धा तास चर्चा केली होती. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तिथे जाऊन ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना ऊत आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांनी अजितदादांचे भावी मु्ख्यमंत्री म्हणून फलक लावले आहेत. त्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच #अजितपर्व’ असे कॅप्शन दिले आहे. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत वाढलेल्या गाठीभेटी याचा काही संबंध आहे का? अशी चर्चा रंगली आहे. महत्वाचे म्हणजे आज एकनाथ शिंदे मोदींची आपल्या संपुर्ण परिवारासह भेट घेणार आहेत. त्यामुळे ही शिंदेंची निरोपाची भेट आहे का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज असून मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने या नाराजीत भर पडली आहे. आता जर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहिले नाहीत तर बंडखोर आमदारांचा बंड करुन फायदा काय? अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोवर मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी मागणी शिंदे गटातील आमदारांची आहे. आता अजित पवार भावी मुख्यमंत्री असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर शिंदे गटातील नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण शिंदे गटात अस्वस्थता मात्र वाढली आहे.

शिंदे गटातील नेत्यांना अद्याप मंत्रीपद मिळालेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा आणखीच वाढला आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा होणार आहे की? पद खाली करण्यास सांगितले जाणार आहे याचा खुलासा पुढील काही दिवसात होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!