Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार ११ मेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत भूकंप होणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सध्या एकाचवेळी सुरु आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्यापुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. पण वकील असिम सरोदे यांच्या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

असिम सरोदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी १० मे आधी नक्की होतील. ११ मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की आहे. राज्यात नवीन राजकीय जुळवा जुळव सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय जबाबदारी सुप्रिया सुळे तर राज्यातली जबाबदारी अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, असं मत असिम सरोदे यांनी आपल्या ट्विटमध्ये मांडलं आहे.सरोदे यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा अजित पवार यांच्या बंडाशी संबंध जोडला आहे. अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवार यांची अडचण होणार म्हणून ते बाजूला गेले आहेत. असे सांगताना शिवसेनेचे आमदार अपात्र झाले तर अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल. ते महाविकास आघाडीसोबत किंवा भाजप सोबत जाऊन सुद्धा सरकार स्थापन करू शकतात, असा दावा असिम सरोदे यांनी केला आहे. पण अजित पवार शरद पवार यांच्या धक्कातंत्रानंतर पक्षातून बाहेर पडण्याचे धाडस करु शकतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण शरद पवार यांनी अचानक राजीनामा दिल्याने पक्ष आणि कार्यकर्ते मानसिक आणि भावनिक दृष्या शरद पवार यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नवीन अध्यक्ष निवडल्यास आणि ते अजित पवार नसल्यास त्यांच्या नाॅट रिचेबल नाट्याचा दुसरा अंक सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे वेगवेगळ्या सर्वेक्षणात राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतच रहावे असा काैल देण्यात आला आहे, तर अजित पवार यांनी महाविकास आघाडीतुन मुख्यमंत्री व्हावे असे जनमत समोर आले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आ्हे. या निकालाच्या आधारे राज्यातील राजकारण बदलेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचे काही आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपाकडून देखील नवीन पर्याय शोधले जात आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्ष आणि कायदेनंत्री रिजिजू यांच्यात याविषयी बैठक पार पडली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!