Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रतिष्ठित फॅशन शो मध्ये या अभिनेत्रीचा जलवा पण….

अभिनेत्रीचा तो व्हिडीओ व्हायरल, लाखोंचा ड्रेस घालूनही अभिनेत्रीचा ....

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- जगभरातील अत्यंत प्रतिष्ठित ‘मेट गाला’ फॅशन शो नुकताच न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या कार्यक्रमात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. भारताकडून मेटामध्ये या अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांनी हजेरी लावली होती, पण यंदा मात्र आलिया हटके लक्ष वेधले.

भव्यदिव्य अशा जगप्रसिद्ध कार्यक्रमात नेहेमीप्रमाणेच हटके एंट्री घेत आलियाने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी आलियाने नखशिखंत मोत्यांमध्ये सजलेली दिसली. या सुंदर गाऊनमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. अनेकांना ती अप्सराच भासली. या सोहळ्याचे काही फोटो आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या १९९२ च्या चॅनेल ब्रायडल लूकपासून इन्स्पायर होऊन गाऊन बनविण्यात आला होता. हा गाऊन बनविण्यासाठी १ लाख मोत्यांचा वापर करण्यात आला होता. तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये आलिया रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससाठी पोझ देत होती. डिझायनर प्रबल गुरुंगसोबत जेव्हा ती समोर येते, तेव्हा काही पापाराझी तिला ऐश्वर्या म्हणून हाक मारताना दिसतात. हे ऐकल्यानंतरही आलिया तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवत फोटोसाठी पोझ देताना दिसून आली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘मेट गाला’मध्ये एकदा ऐश्वर्यालाही कतरिना कैफ अशी हाक मारण्यात आली होती. त्यामुळे आलिया भट्टबाबत झालेली ही घटना काही नवीन नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट कॉस्च्युम इन्स्टिट्यूट या संस्थेकडून हा फॅशन शो आयोजित केला जातो. या फॅशन शोमधून उभारलेला निधी हा कॉस्च्युम इन्स्टिट्यूटला दान करण्यात येतो.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!