मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप; आक्रमक आंदोलकांनी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवली
मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून आवारातच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत दोघांनी जाळल्याची घटना आज, मंगळवारी ( दि.२४ ) सकाळी घडली. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. जरांगे यांची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. सरकारकडून मागण्या पूर्ण होत नाहीत आणि जरांगे यांची तब्येत खालवल्याने मराठा समाजात असंतोष आहे. फुलंब्री येथे मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात आज सकाळी आंदोलन करण्यात आले. साबळे आणि इतर एकाने थेट तहसीलदार यांच्या दालनातून त्यांची खर्ची बाहर आणत तहसील कार्यालय परिसरात पेट्रोल टाकून खुर्ची पेटविण्यात आली. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे हे आपल्या दोन सहकारी सोबत सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयात आले. तहसीलदार यांच्या दालनात कोणी नसल्याने त्यांनी खुर्ची बाहेर काढली. इमारतीच्या समोर पेट्रोल टाकून खुर्ची पेटवून दिली. त्यांनी एक मराठा लाख मराठा आशा घोषणाबाजी केली. अचानक ही घटना घडली यावेळी काही कर्मचारी तिथे उपस्थित होते. त्यांनी काही विरोध केला नाही. त्यानंतर काही वेळात मंगेश साबळे आपल्या सहकार्य सोबत निघून गेले.
जातवा येथील तरुणाने सोमवारी मराठा आरक्षण करीत आत्महत्या केली होती त्या संदर्भात घाटी रुग्णालयात गेलो होतो तहसील कार्यालयात खुर्ची जाळण्याची माहिती मिळाली असती तात्काळ पोहचलो या संदर्भात संबंधित लोका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती तहसीलदार डॉ. कृष्णा काणगुले यांनी दिली सरकारने मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे यांचा बळी देयचा आहे, असा आरोप करत आमचा देखील एन्काउंटर करावे, असे आव्हान खुर्ची पेटवल्यानंतर आंदोलकांनी केले. दरम्यान, मराठा आरक्षण विषयी सरकार दखल घेत नाही म्हणून तहसीलदारची खुर्ची पेटवून निषेध केला, अशी प्रतिक्रिया सरपंच मंगेश साबळे यांनी दिली