Just another WordPress site

निवडणूक आयोगाकडुन ठाकरे शिंदे गटाला ‘या’ नावाचे वाटप

ठाकरेंना मिळाले 'हे' चिन्ह तर शिंदे अजूनही वेटिंगवरच, बघा कोणाला काय मिळाले

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत चिन्ह आणि नावांचे वाटप केले आहे. ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळाले आहे. चिन्हाच्या बाबतीत ठाकरेंना मशाल चिन्ह देण्यात आले आहे. तर शिंदेंकडे चिन्हासाठी नवे पर्याय मागितले आहेत.

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह पाठवण्यात आली, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता तर शिंदे गटाकडून उगवता सूर्य, गदा आणि त्रिशूळ ही तीन पक्ष चिन्ह मागण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं शिंदे गटाने निवडणूकज आयोगाकडे पाठवली होती. पण धार्मिक चिन्हाचे कारण देत शिंदे गटाची तीनही चिन्हे बाद करण्यात आली तर ठाकरेंची दोन चिन्हे बाद करण्यात आली. ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले आहे.चिन्हामध्ये ठाकरेंना मशाल चिन्ह देण्यात आले आहे.तर शिंदे गटाला नवीन चिन्ह सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

GIF Advt

या निर्णयानंतर शिंदे गटाकडून बाळासाहेबांची शिवसेना आमचीच असल्याचे सिद्ध झाल्याचे म्हटले आहे तर ठाकरे गटाकडून पहिल्याच प्रयत्नात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पूर्णपणे जिंकले आहेत. याचं कारण म्हणजे आम्हाला जे नाव मिळालं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं नाव राहिलं. बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव राहिलं आहे असे सांगत चिन्हाची झलक प्रसिद्ध केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!