….आणि अमित शहा या राज्याच्या गृहमंत्र्यावर थेट ओरडलेच
अमित शहा रागावल्याचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं शिबिरात काय घडलं?
हरियाणा दि २८(प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हरियाणातील सुरजकुंडमध्ये सर्व राज्यातील गृहमंत्र्यांचे एक चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात देशातील सुरक्षेवर चर्चा केली जात आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या शिबिरात सहभागी झाले आहेत. पण यावेळी एका राज्याच्या गृहमंत्र्याचे भाषण अमित शहा यांनी संताप व्यक्त करत खडसावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हरियाणात चिंतन शिबीर असल्याने हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज उद्घाटना भाषण करत होते. यावेळी ते म्हणाले की, “संपूर्ण हरियाणातून येणाऱ्या लोकांच्या तक्रारीही आम्ही आठवड्यातून एकदा ऐकतो. जेव्हा एखादा अधिकारी आपले कर्तव्य नीट पार पाडत नाही, तेव्हा आपण त्याचा छळ करतो. त्याने चूक केली तर आपण त्याला शिक्षाही देतो, पण त्याने चांगले काम केले तर त्याला बक्षीसही देतो” पण छळ शब्द वापरल्यावर अमित शहांनी “अनिल जी थोडं थोडक्यात सांगावं लागेल. तुमची वेळ ५ मिनिटे होती, तुम्ही ८:३० मिनिटे बोललात. तुम्ही जरा आटोपते घ्या. तरच कार्यक्रम पुढे जाईल’, असे सांगितले. विज यांनी याकडेही दुर्लक्ष करत मी ११२ मोहिमेवर सांगत आहे, असे उत्तर शहांना दिले. यावर अमित शहांनी विज यांना थेटच आता तुमचे भाषण थांबवा, आपल्याला वेळेनुसार पुढे जावे लागेल, असे सुनावले. यानंतर विज यांचा नाईलाज झाला आणि त्यानी भाषण थांबविले. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या शिबिरात अमित शहांनी “२०२४ पर्यंत म्हणजेच येत्या दोन वर्षात प्रत्येक राज्यामध्ये एनआयएचे कार्यालय असेल, अशी घोषणा केली.तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नक्षलवादावर चिंता व्यक्त करताना पोलिसांसाठी एक देश एक गणवेश धोरणावर विचार करण्याचे आवाहन केले. पण सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आले आहेत.