कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची दुष्काळ पाहणीत ‘दारु पे चर्चा’
कृषीमंत्री पुन्हा नव्या वादात, व्हिडिओ व्हायरल शेतकऱ्यांमध्ये संताप
बीड दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळात मेटाकुटीला आले असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार मात्र राज्यात ओला दुष्काळ नसल्याचे सांगत आहेत. आता पुन्हा एकदा कृषीमंत्री आपल्या वक्तव्याने वादात अडकले आहेत. कृषीमंत्री ओला दुष्काळ पाहणीच्या नावाने बीड जिल्ह्यात असताना त्यांनी चक्क दारु पे चर्चा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांचा बीड जिल्ह्यात दौऱ्यावर असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अब्दुल सत्तार यांनी थेट बीडमध्ये पाहणी दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का? असा प्रश्न विचारला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कधी कधी थोडी घेतो, असं उत्तर दिलं आहे. सत्तार यांचा प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्यांचं उत्तर असणारी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिपने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. नेमका सोशल मिडीयावर ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून ट्रेंड चालवण्यात आला होता. त्यामुळे सत्तार शेतकऱ्यांसह नेटक-यांच्या निशान्यावर आले आहेत.

अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. बीड जिल्हाधिकारी हे हिंदी भाषिक आहे, ते प्रमाणिकपणे काम करतात त्यामुळे तो व्हिडिओ किती व्हायरल व्हायचा आहे ते होऊ द्या खाजगीत काही बोलावे की नाही, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केली आहे.