Just another WordPress site

आतापर्यंत पकडलेल्या डासांमध्येनर किती मादी किती?

सभागृहात भुजबळांचा सवाल सत्ताधारी मात्र बेहाल

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची फिरकी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पालघरमधील आरोग्य सुविधेच्या मुद्यावर असा काही सवाल विचारला की विरोधकांसह सत्ताधारीही मनमुराद हसले पण सावंत यांची मात्र गोची झाली.

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत यावर सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले आणि डास घनता काढली असे उत्तर दिले. यावर प्रश्न विचारताना छगन भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले, किती डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहे की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ? असे गमतीशीर प्रश्न भुजबळ यांनी विचारले. त्यामुळे सभागृहात एक हशा पिकली. त्यामुळे सावंत पुन्हा एकदा निरुत्तर झालेले पहायला मिळाले.अखेर सावंत यांनी भुजबळांच्या प्रश्नावर, याचा सविस्तर अहवाल टेबल केला जाईल, अशी माहिती दिली. त्यावेळी सभागृहात हास्याची लाट उसळली होती.

GIF Advt

फडणवीस मुख्यमंत्री असताना सभागृहात उंदिरांच्या बाबतीत प्रश्न विचारला होता. त्यावेळी एक उंदीर किती उंदराना जन्म देते मेलेल्या उंदरात नर उंदीर किती मादी उंदीर किती असा सवाल विचारला होता. तर भुजबळ यांनी आज डासांवर प्रश्न विचारत सरकारची कोंडी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!