Just another WordPress site

आईने मुलीवर अत्याचार करणाऱ्याचे गुप्तांग कापले

पोलिसही चक्रावले, जखमी तरूण रूग्णालयात दाखल

लखनऊ दि २२(प्रतिनिधी) – शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या लखीमपूर खीरीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नरधमाला मुलीच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे. या धड्यानंतर मुलाची अवस्था गंभीर असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

GIF Advt

मिळालेल्या माहितीनुसार लखीमपूर खीरी जिल्ह्यातील कमलापुरीत ही घडली घडली. मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीवर हल्ला करत मुलीच्या आईनं त्याचं गुप्तांगच कापल आहे. यामध्ये आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हरिशंकर असे त्या मुलाचे नाव आहे. तरूणाने मात्र महिलेने दोन जणांसोबत मिळून मारहाण केली आणि गुप्तांग कापलं.अशी तक्रार केली दिली आहे.तर महिलेनं तरुण जबरदस्ती घरात घुसून तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बचाव करताना हल्ला करत त्याचं गुप्तांग कापलं असे सांगितले आहे. तर हल्ला झालेला तरूण मुलीच्या आईचा लिव्ह इन पार्टनर असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे पोलीसांनी आरोपीला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पुढची चाैकशी केली जाईल असे सांगितले आहे.

अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनेत वाढ झाली असून पोलीस अशा घटना रोखण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे या महिलेने केलेल्या हल्ल्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!