Latest Marathi News
Ganesh J GIF

अभिनेत्री असलेल्या महिला उमेदवाराचा जुना व्हिडिओ व्हायरल

निवडणुक काळात व्हिडिओ व्हायरल झाल्याने जोरदार चर्चा, दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप, व्हिडीओत नेमके काय आहे?

भोपाळ दि २३(प्रतिनिधी)- देशात सध्या पाच राज्यात निवडणूकीचा काळ सुरू आहे. लोकसभा निवडणुक जवळ आली असल्याने या पाच राज्याच्या निवडणुकाकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. पण याच दरम्यान एका महिला उमेदवाराचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशमधील आपच्या उमेदवार चाहत पांडे या दमोह विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. पण पांडे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्या आंख मारे या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. एक मिनिट आणि सहा सेकंदांचा हा व्हिडीओ कधीचा आहे हे समजलेले नाहीय परंतू तो निवडणूक काळात मुद्दाम व्हायरल करण्यात आला आहे. चाहत पांडे या अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांनी गाण्यावर डान्स करणे चुकीचे कसे असू शकते. असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान चाहतने आपच्या वतीने निवडणुक लढवली आहे. तसेच आता राजकारण आणि कला क्षेत्र दोन्ही विभागामध्ये आपण सक्रिय राहणार असल्याचा दावा चाहतने केला आहे. चाहतने राजकारणी व्हावं अशी तिच्या आईची नेहमीपासूनच ती इच्छा होती. तिलाही राजकारणात रस होताच त्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. आता ती दमोह मधून निवडणूक जिंकणार की पराभूत होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मध्य प्रदेशमधील मतदान पूर्ण झाले आहे. अणि त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे की, त्या अगोदर व्हायरल झाला होता. याबाबत देखील कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दरम्यान कोणाला हा डान्स आवडला आहे तर काहीजण त्यावर टीका करत आहेत. दरम्यान आपने एखादा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री चाहत पांडेने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. वयाच्या १७ व्या वर्षी पवित्र बंधन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तेनालीरामन, राधा कृष्णन, सावध इंडिया, नागिन-२, दुर्गा-माता की छाया, अलादीन आणि क्राइम पेट्रोल यासह अनेक मालिकांमध्ये ती दिसली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!