…आणि आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ
पुण्यात रहिवासी सोसायटीत भीषण आग, अग्निशमन दलाचा व्हिडिओ व्हायरल
पुणे दि १७(प्रतिनिधी) – पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीत आग लागल्याची घटना घडली होती. शाॅर्ट सर्किटमुळे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली. मात्र यावेळी एका गाडीमध्ये पाणी नसल्याने अग्निशमन जवानांची चांगलीच धावपळ उडाली होती. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
श्रावणधारा हाउसिंग सोसायटी ही चौदा मजली इमारत असुन दुसरा मजल्याला आग लागली आहे. दुसरा मजल्यापासुन एक एक मजला वरती पेट घेत असुन घरगुती विद्युत वायर मुळे हि आग भडकत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पण जवानांनी सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश मिळवले होते. आग लागल्याची घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलांकडून फायरगाड्या आणि पाण्याचे टँकर रवाना करण्यात आले होते. पण त्यातील एका गाडीमध्ये पाणी नसल्याचं समोर आलं आहे. तर एका गाडीत पाणी नसल्याचे लक्षात येताच लोकांनी संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या. त्यातील एका गाडीमध्ये पाणी नसल्याने जवानांची धांदल उडाली होती.जर आग मोठी असती आणि पाण्याची गरज लागली असती तर पाणी नसलेल्या गाडीचा काय उपयोग झाला असता? असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
पुण्यात आज दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. कोथरूड येथील पौड रस्त्यावर असणाऱ्या आनंदनगर भागात “प्रभा को ऑप सोसायटी” आहे. या सोसायटीमध्ये पहाटे आग लागली होती. या आगीमध्ये अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलास यश आले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.