Just another WordPress site

आता या नेत्याच्या पत्नी म्हणाल्या ‘मी पुन्हा येईन’

अहमदनगरमधील डायलॉगबाजीचा व्हिडिओ व्हायरल, बघा कोण आहेत या

अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेला ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. फडणवीसांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मारलेल्या या डायलाॅगमुळे त्यांनी मोठी टिकाही सहन करावी लागली होती. पण आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तोच डायलाॅग मारत राजकारणात ट्विस्ट निर्माण केला आहे.

अमृता फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आल्या होत्या. याठिकाणी जनसेवा फाउंडेशन लोणी आणि पंचायत समिती राहाता यांच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या.या कार्यक्रमाला यायला अमृता यांना उशीर झाल्यामुळे दिलगीरी व्यक्त करत ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा डायलॉग मारला आहे. त्याचबरोबर “भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं, हे मोदी यांचं स्वप्न आहे. ‘मेक इन इंडिया’ बनवणं हेही मोदींचं स्वप्न आहे. पण त्यांचं स्वप्न तेव्हाच साकार होईल, जेव्हा प्रत्येक स्त्री यामध्ये योगदान देईल. आपण सगळे मिळून भारतासाठी हे स्वप्न साकार करू,जेव्हा तुमचं कुटुंब सुखी, समाधानी राहील, तेव्हाच हे स्वप्न साकार होईल.” असे मिसेस फडणवीस म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या गायनाची झलक दाखवली आहे.

GIF Advt

देवेंद्र फडणवीसांचा मी पुन्हा येईनचा डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत फडणवीस यांनीही हाच डायलाॅग मारला आहे. त्यामुळे अमृता फडणवीस राजकारणात येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. फडणवीस यांनी याआधी ही शक्यता नाकारली असली तरीही या डायलाॅगमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!