बिहार दि १९(प्रतिनिधी)- देशभरात सर्वांना वेध लागले आहेत ते दिवाळीचे.प्रत्येकजण दिवाळीची तयारी करण्यात व्यस्त आहे.पण एका भाजपा आमदाराला दिवाळी साजरी करणे चांगलेच महागात पडले आहे. भाजपा आमदार विनय कुमार सिंह आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके फोडत होते. पण फटाक्यांची माळ लावून पळत असताना अचानक त्यांचा तोल गेला अन् ते तोंडावर पडले. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
बिहारमधील सोनपुर येथील आमदार विनय कुमार सिंह एका फुटबॉल मॅचचे उद्घाटन करायला गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके फोडले. पण फटाक्यांची माळ लावून पळत असताना त्यांचा तोल गेला आणि ते थेट तोंडावरच आपटले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. आता तो व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.
फटाके वाजवल्याशिवाय दिवाळी साजरी केली असं लोकांना वाटतच नाही. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वृद्ध मंडळींपर्यंत सर्वच जण फटाके वाजवून मोठ्या उत्साहानं दिवाळी सादरी करतात. पण हे फटाके फोडणे भाजपा आमदाराल कायम लक्षात राहणार आहे.