या अभिनेत्रीचा प्रपोज करतानाचा व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्री झालीय प्रेमात वेडी, बघा ती नक्की काय म्हणते....
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अलीकडे जास्तच चर्चेत असते ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. उर्वशीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘आय लव्ह यू’ असं म्हणतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. उर्वशीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिला ट्रोलही करण्यात आले होते. अखेर तिने या व्हिडीओवर खुलासा केला आहे.
उर्वशीने आय लव्ह यु या व्हिडीओसंदर्भात स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. “माझा आय लव्ह यू म्हणतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी ही पोस्ट शेअर करत आहे. त्या व्हिडीओमध्ये केवळ अभिनय करण्यात आलेला आहे. व्हिडीओमधील डागलॉग हा कोणाला उद्देशून म्हणालेले नाही”, असे तिने स्पष्ट केले आहे.तिच्या व्हायरल व्हिडीओत “आप बोलो आय लव्ह यू…नही पहले आप बोलो आय लव्ह यू…एक बार बोल दो…बस एक बार बोल दो”, असं ती म्हणताना दिसत होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ऋषभ पंतचं नाव घेत कमेंटही केल्या होत्या. तर काहींनी तिला ट्रोल केले होते. तसेच ती रिषभ पंत बरोबरच्या वादामुळे ती चर्चेत आली होती.

उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती अनेक व्हिडीओ आणि फोटो तिच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असते. उर्वशीने आपले केस कापत इराणमधील महिलांच्या हिजाबविरोधी आंदोलानाला तिने केस कापत पाठिंबा दर्शविला होता.